Posts

उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग; ‘व्हिलेज लाईफ’ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन ..

पुणे : चित्रप्रदर्शनाद्वारे ग्रामीण जीवनाचे दर्शन आज पुणेकरांना घडले. ग्रीष्म ऋतूत लालबुंद फुलांनी बहरलेला गुलमोहोर... वसंत ऋतूमध्ये विविध रंगांनी नटलेला निसर्ग... कौलारू घराच्या अंगणात बागडणाऱ्या कोंबड्या... सोनेरी रंगाची  उधळण  करणारी खेड्यातील रम्य सायंकाळ या चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे. या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा आदी उपस्थित होते. थोपटे म्हणाले, ‘‘प्रदर्शनात चित्रांमध्ये लहान मुले, प्राणी आणि ग्रामीण जीवनातील विविध क्षण, सौंदर्य पाहायला मिळते. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैल

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली.....

Image
पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचं स्वरूप असतं. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे. 

प्रशासनाच्या करवाढीवर स्थायी समितीची कु-हाड, पुणेकरांना दिलासा....

प्रशासनाच्या या करवाढीला समितीच्या सर्वच सदस्यांनी तीव्र विरोध केला. सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना त्यासाठी तयार केले होते. १५ टक्के नाही तर १० टक्के तरी करवाढ करावी, या आयुक्तांच्या मागणीला स्थायी समिती सदस्य, तसेच पक्षनेत्यांनी मान्यता दर्शवली होती. मात्र पडद्याआड अनेक हालचाली झाल्या व अखेर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला करवाढ मागे घेण्याचा निर्णय घ्यावाच लागला. ते नाहीत म्हटल्यावर समितीमधील अन्य पक्षांच्या सदस्यांनीही करवाढ नकोच, असे मत व्यक्त केले व ही करवाढ फेटाळली गेली. स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी करवाढ फेटाळली असल्याची माहिती दिली. मिळकत कराची सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात तब्बल १ हजार २०० कोटी रुपये तर फक्त दंडाचीच रक्कम आहे. दंडाच्या रकमेत काही सवलत जाहीर केली तर त्यातून किमान ३०० ते ४०० कोटी रुपये वसूल होऊ शकतात. त्याप्रमाणे योजना तयार करून समितीला देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे, असे मोहोळ म्हणाले. पाणीपट्टीचीही ५०२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात अनेक बडे लोक आहेत. त्यांनी न्यायालयात दावे केले

शिक्षण क्षेत्रासाठी 'दिवाळी'...

पुणे - केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा शिक्षण क्षेत्रासाठी "दिवाळी' आहे. या क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतुदीमुळे संशोधन आणि गुणवत्ता विकासाला मोठे पाठबळ मिळेल, अशा शब्दांत शिक्षण तज्ज्ञांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) : शिक्षणासाठी अर्थसंकल्पात केलेली भरीव तरतूद या क्षेत्राला नवी दिशा देईल. तरुण संशोधक विद्यार्थ्यांचाही विचार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी पाठ्यवृत्ती ही संशोधनाला चालना देणारी ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. एस. के. जैन (अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी) : वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्या वाढणार असल्याने डॉक्‍टरांची संख्या वाढण्यास मदत होईल; तसेच शिक्षण संस्थांना देणगी देणाऱ्यांना 80-जीची सवलत मिळते; पण ती कमी आहे, त्यात मोठी वाढ केल्यास देणगीदारांची संख्या वाढेल आणि संस्थांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस) : शिक्षणाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आश्‍वासक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी एकात्मिक